माझ्या लेकासाठी प्रेमाशिर्वाद
9 सप्टेंबर 2026
प्रिय मिलिंद,
तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐🎂💐तू परदेशात असलास तरी तुझं मन मात्र सदैव आपल्या कुटुंबाशी जोडलेलं असतं. दूर राहूनही घरातील प्रत्येकाची काळजी घेणारा, सगळ्यांच्या सुख-दुःखात मनापासून सहभागी होणारा आणि आपल्या शिंत्रे कुटुंबातील प्रत्येकाचा लाडका असलेला तू आमच्यासाठी खरोखरच खूप खास आहेस.
सगळ्यांवर प्रेम करणारा तुझा प्रेमळ स्वभाव आणि कुटुंबासाठी सतत काहीतरी करण्याची तुझी भावना आम्हाला नेहमीच अभिमान वाटून देते.
बाळा, तू तुझ्या तब्येतीची विशेष काळजी घे. वेळेवर खा, पुरेशी विश्रांती घे आणि स्वतःला आनंदी ठेव. इकडच्या कोणत्याही गोष्टीचे टेन्शन अजिबात घेऊ नकोस. आम्ही सगळे आहोत आणि सगळं व्यवस्थित होईल. तू फक्त तुझ्या आयुष्यावर आणि तुझ्या आरोग्यावर लक्ष दे.
देव तुला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, भरभराट, सुख-समाधान आणि प्रत्येक क्षेत्रात यश देवो, हीच आई-वडिलांची मनापासून प्रार्थना आणि आशीर्वाद.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, मिलिंद! ❤️🎂💐
तुझ्यावर आमचे आशीर्वाद आणि प्रेम सदैव राहील.
— पप्पा मम्मी
Comments
Post a Comment