ग्रामस्थ मंडळ व पतसंस्था वार्षिक सभा

 आज श्रमसाफल्य सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई आणि त्याचप्रमाणे पेद्रेवाडी ग्रामस्थ मंडळ, मुंबई यांच्या 26 व्या सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. 




सभेच्या सुरुवातीलाच श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला. वर्षभरात गावातील ज्या व्यक्ती दिवंगत पावल्या त्यांना श्रद्धांजली वाहताना विशेष करून पतसंस्थेचे खजिनदार कै.गोविंद दत्तू चव्हाण यांचा विशेष उल्लेख केला गेला. 
मे २०२५ मध्ये काही गोविंद चव्हाण यांचे अचानक निधन झाले आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली. सगळ्या चव्हाण कुटुंबीयांना एकत्र बांधण्याचा तो एक दुवा होता. कोल्हापूरकरांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिलाईल रोडशी कै. गोविंद चव्हाण यांचे अतूट आणि जिव्हाळ्याचे नाते होते. विक्रोळी येथे वास्तव्यास असूनही ग्रामस्थांच्या सुख-दुःखाशी ते सदैव जोडलेले राहिले. ग्रामस्थांच्या हितासाठी त्यांनी वेळोवेळी मोलाचे योगदान दिले आणि समाजसेवेची निःस्वार्थ भावना जपत अनेकांना प्रेरणा दिली.
ते ‘जीवनविद्ये’चे साधक होते. कोणत्याही सामाजिक किवा वैयक्तिक कार्यक्रमाच्यावेळी विश्वशांतीच्या प्रार्थना म्हणत असत. त्यांच्या अनुपस्थितीतही प्रत्येक क्षणी त्यांची आठवण आम्हा सर्वांना निश्चितच होत राहील. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही.



 अशा या सेवाभावी, प्रेमळ आणि संयमी व्यक्तिमत्त्वास ग्रामस्थ व सभासदांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!

या प्रसंगी गुणी विद्यार्थ्यांचा आणि ग्रामस्थ मंडळाच्या नवीन कमिटीचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रौप्य महोत्सव थोड्याच कालावधीत आयोजित करण्याचे ठरवण्यात आले.

२०१० साली  मला गावाबद्दल वाटणाऱ्या भावना एका  कागदावर लिहिल्या होत्या, तो कागद योगायोगानं काल मिळाला. पेद्रेवाडी (सुंदरवाडी) ग्रामस्थ मंडळ यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगणारं गावाबद्दलचं शब्द पुष्प तयार केलं होतं, ते असं :-

सुंदरवाडी ग्रामस्थ मंडळ

'सुं' दर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवूनिया असे विठ्ठलाचे ध्यान लाभलेलं पेद्रेवाडी गांव.
'द' सरा  दिवाळी सणाप्रमाणे नेहमीच एकमेकांना शुभेच्छा देणारे ग्रामस्थ लाभलेलं गांव
'र' णरागिनीप्रमाणे असणाऱ्या महिलांची जिल्हा पातळीवर राजकीय घोडदौड लाभलेलं गांव.
'वा' खाणण्यासारखी सर्वच क्षेत्रात प्रगती करणारे सुपुत्र लाभलेलं गांव.
'डी' कमाळीसारखी उंच मनोरा उभारण्याचे धाडस करणारी तरुण पिढी लाभलेलं गांव
'ग्रा' मराज्य हे 'रामराज्य' झाले तरच स्वराज्याचे सुराज्य होईल अशा विचारसरणीचे नेते लाभलेलं गांव.
'म' सोबा या जागृत देवस्थानाची मुंबईत दरवर्षी यात्रा साजरी करणारे एकमेव गांव.
'स्थ' लांतर करून मुंबईत वास्तव्य करून सुद्धा गावच्या विकास कार्यात लक्ष देणारं गांव.
'मं' गल समयी किंवा बिकट प्रसंगी आपुलकीने 'गांव हे एक कुटुंब' समजून सहकार्य करणारं गांव.
'ड' गमगणार नाही कधीच असा आत्म निश्चय करून सागरात जीवन नया चालवणारे ग्रामस्थ लाभलेलं गांव
'ळ' कमळातले. कमळ जसे चिखलात उमलते तसे पेद्रेवाडी गांवात जन्म घेऊन गांवचे नांव रोशन करणारे गांव 




Comments

  1. श्रमसाफल्य सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी कारकीर्द निमित्त हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा !😊🙏🏻🙏🏻

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

🎶 हेमंतकुमार - अविस्मरणीय मैफल! 🎶

गणपतीपुळे पिकनिक : एक स्नेह संमेलन