केदारनाथ-बद्रीनाथ यात्रा : सुनेच्या अनुभवातून यात्रेचं दर्शन!
घरातील गंगापूजन आणि रुद्राभिषेक हिमालयाच्या कुशीत वसलेली केदारनाथ आणि बद्रीनाथ ही दोन पवित्र तीर्थक्षेत्रे म्हणजे कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेची केंद्रे! या देवभूमीचे आध्यात्मिक महत्त्व जितके मोठे, तितकीच तेथील यात्रा शारीरिक कष्टांची, मानसिक धैर्याची आणि निसर्गातील आव्हानांना सामोरे जाण्याची परीक्षा पाहणारी आहे. नुकतीच आमची सून सौ. प्रज्ञा, माझा पुतण्या समीर याची पत्नी, ही पवित्र तीर्थक्षेत्रांची यात्रा करून सुखरूप परतली. तिच्या प्रवासाचे अनुभव तिच्याच तोंडून ऐकताना मनात भक्तिभाव, तिच्या धाडसाविषयी कौतुक आणि काही प्रसंगांच्या वर्णनाने भीती अशा संमिश्र भावना निर्माण झाल्या. यात्रा पूर्ण करून चार-पाच दिवसानंतर प्रज्ञा आमच्या घरी ती तिकडचा प्रसाद देण्यासाठी आली, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर प्रवासाचा थकवा जाणवत होता; पायांनाही सूज होती. मात्र, या सगळ्या शारीरिक त्रासापलीकडे तिच्या चेहऱ्यावर यात्रेचे समाधान आणि मनात पवित्र स्थळांच्या दर्शनाचा आनंद स्पष्ट दिसत होता. तिच्या प्रवासाविषयी गप्पा सुरू झाल्या आणि ती आपल्या अनुभवांची शिदोरी उलगडू लागली. ती म्हणाली, “या संपूर्ण यात्रेत मी सुमार...